लॅपटॉपचा फॅन दरवेळेस सुरु असतो
लॅपटॉपमधील कूलिंग फॅन नेहमी चालत असल्यास, कूलिंग प्रणाली नियंत्रीत करणारे हार्डवेअर Linux मध्ये बऱ्यापैकी समर्थीत नसेल. कूलिंग फॅन्स कार्यक्षमपणे नियंत्रीत करण्यासाठी काही लॅपटॉप्सला अगाऊ सॉफ्टवेअरची आवश्यकता असू शकते, परंतु हे सॉफ्टवेअर इंस्टॉल करायची आवश्कता नाही (किंवा Linux करिता उपलब्ध नसेल) आणि म्हणूनच फॅन्स पूर्ण वेळ, वेगाने चालतात.
असे असल्यास, तुम्ही काही सेटिंग्ज बदलू शकता किंवा फॅन नियंत्रीत करण्यासाठी अगाऊ सॉफ्टवेअर इंस्टॉल करू शकता. उदाहरणार्थ, काही Sony VAIO लॅपटॉप्सवर फॅन्स नियंत्रीत करण्यासाठी vaiofand इंस्टॉल करणे शक्य आहे. ह्या सॉफ्टवेअरला इंस्टॉल करणे बऱ्यापैकी टेक्निकल प्रक्रिया आहे जे तुमच्या लॅपटॉपच्या मेक आणि मॉडलवर आधारित आहे, तसेच तुमच्या संगणकावर हे कसे करायचे याकरिता सल्ला घ्यायला आवडेल.
तुमचे लॅपटॉप जास्त गरम होण्याची देखील शक्यता आहे. याचा अर्थ ओव्हरहिटिंग होते असे नाही; त्यास पूर्ण वेगाने चालणाऱ्या फॅनची आवश्यकता असू शकते जेणेकरून ते थंड राहेल. असे असल्यास, तुमच्याकडे फॅनला पूर्णवेळ वेगाने चालवण्याचे खूप थोडे पर्याय उपलब्ध राहतात. तुम्ही कधीकधी तुमच्या लॅपटॉपकरिता अगाऊ कूलिंग ॲक्सेसोरिज विकत घेऊ शकता.