बॅकअप परत मिळवा

फाइल्स गमवले किंवा नष्ट केले असल्यास, परंतु तुमच्याकडे त्याचे बॅकअप असल्यास, त्यास बॅकअपपासून पुन्हा साठवणे शक्य आहे:

  • साधन जसे कि एक्सटर्नल हार्ड ड्राइव्ह, USB ड्राइव्ह किंवा नेटवर्कवरील इतर संगणकापासून बॅकअप पुन्हा साठवायचे असल्यास, संगणकावर पुन्हा त्यांचे प्रत बनवा.

  • बॅकअप ॲप्लिकेशन जसे कि Déjà Dup यांचा वापर करून बॅकअप निर्माण केले असल्यास, बॅकअप पुन्हा साठवण्याकरिता समान ॲप्लिकेशनचा वापर करणे शिफारसीय आहे. बॅकअप प्रोग्रामकरिता ॲप्लिकेशन मदतचे पूनरावलोकन करा: फाइल्स पूर्वस्थितीत आणण्याविषयी ठराविक सूचना पुरवले जाईल.