बॅटरीवर कार्यरत असल्यास लॅपटॉप हळु का होते?

पावर साठवण्याकरिता बॅटरीवर कार्यरत असताना काही लॅपटॉप्स जाणूनबुजून हळू होतात. लॅपटॉपमधील प्रोसेसर (CPU) हळु गतीचा वापर करतात, आणि हळुवारपणे कार्य करताना प्रोसेसर्स कमी पावरचा वापर करतात, ज्यामुळे बॅटरी जास्त वेळ चालते.

हे गुणविशेषला CPU फ्रिक्वेंस स्केलिंग असे म्हटले जाते.