Windows/Mac OS वर असताना बॅटरीची आयु कमी का आहे?

Windows किंवा Mac OS च्या तुलनेत Linux वर कार्यरत असतेवेळी काही संगणकांमध्ये कमी बॅटरी आयु असते. याकरिता एक कारण म्हणजे Windows किंवा Mac OS करिता संगणक विक्रेता विशेष सॉफ्टवेअर इंस्टॉल करतात जे ठराविक संगणकाच्या मॉडलकरिता विविध हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर सेटिंग्जची सुधारणा करते. हे बदल सहसा निर्देशीत असतात, आणि याचे दस्तऐवजीकरण केले नसणार, म्हणूनच Linux मध्ये यास समावेश करणे कठिण आहे.

दुर्दैवाने, संपूर्ण माहितीविना हे बदल स्वतःहून लागू करण्याचा सोपा पर्याय नाही. तरी, काही पावर-सेव्हिंग पद्धती यांचा वापर उपयोगी ठरू शकतो. संगणकात वेरियेबल-स्पीड प्रोसेसर असल्यास, सेटिंग्ज बदलल्याने फायदा होऊ शकतो.

तफावतकरिता इतर संभाव्य कारण म्हणजे Linux च्या तुलनेत Windows/Mac OS वरील बॅटरीची आयुचा अंदाज काढण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. प्रत्यक्ष बॅटरीची आयु समान असू शकते, परंतु वेगळ्या पद्धती वेगळे अंदाज प्रस्तुत करतात.